मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कृषिमंत्री दादाजी भुसे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार 30 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक सतिश पप्पू यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नाशिक येथे १ मे रोजी कृषी व्यवसायातील सहभागी महिलांचा मेळावा आणि 2 मे रोजी कृषि पुरस्कारांचे वितरण होणार आहे. याविषयी आणि एकूणच महिलांचा कृषि व्यवसायातील सहभाग वाढावा आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन राबवित असलेल्या योजनांचा फायदा कसा होतो याविषयी सविस्तर माहिती, मंत्री श्री. भुसे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.