Home बातम्या ऐतिहासिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

0
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

नाशिक दिनांक 01 मे 2022 (विमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी अपर आयुक्त भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी तथा  विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका गीतांजली बाविस्कर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त(महसूल) गोरक्षनाथ गाडीलकर, उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार, उपायुक्त (पुनर्वसन) दत्तात्रय बोरूडे, नगररचना, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, सहायक आयुक्त कुंदनकुमार सोनवणे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त कार्यालय नूतनीकरण झालेल्या विभागीय आयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सचिन पाटील यांनी उपस्थित अधिकारी यांचे आभार मानले.

०००