Home बातम्या ऐतिहासिक महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद

0
महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद

निर्भय पथकाचा लोकापर्ण सोहळा संपन्न
महिलांसाठी 5 एकर जागेंवर ‘महिला भवन’

पालघर दि. 1 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांचा सन्मान कृतीतून झाला पाहिजे हे ध्येय ठेऊन विविध क्षेत्रामध्ये काम करण्याऱ्या महिलांना  निवारा  उपलब्ध  होण्यासाठी 5  एकर जागेवर महिला भवन, बांधण्यात येणार आहे.  तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा सहभाग  30 टक्के राखीव ठेवण्यात आला होता. आता तो वाढवून 50 टक्के करण्यात आला आहे, असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याचा 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी पालकमंत्री ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी श्री. वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. किरण महाजन, तसेच लोकप्रतीनीधी वरीष्ठ अधिकारी व नागरिक  उपस्थित  होते.
महिलांच्या सुरक्षितेसाठी निर्भया पथकाचे लोकार्पण पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते  करण्यात आले.या पथकासाठी जिल्हा नियोजन समितीने 50 दोनचाकी आणि 3 चारचाकी वाहने उपलब्ध करून दिले आहेत

कृषी, फलोत्पादन आणि सलंग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन वाढीसाठी योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. 2 मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
पालघर जिल्हयात  वनहक्क कायद्याअंतर्गत वाटप केलेल्या वैयक्तीक 48 हजार 356 वनहक्के दावे व सामुहीक 446 वनहक्क दावे मंजूर करुन त्यांच्या 7/12 वर नोंदी घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

तृतीयपंथीयांच्या स्मशान भूमीचा प्रश्न हा नेहमीच दुर्लक्षीत राहिला असल्याने, पालघर जिल्हा प्रशासनाने, संबंधित स्थानिक  स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी तृतीयपंथीय व्यक्तींना सुविधा पुरविल्या जातील याची खात्री करणे त्याचप्रमाणे तसेच तृतीयपंथीय व्यक्तींना सर्व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हि त्यांची जबाबदारी बंधनकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
मनरेगावर कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम – पारधी जमातीतील सर्व कुटुंबे, वनहक्क धारक कुटूंबे, अनुसूचित जमातीतील परितक्त्या, घटस्पोटीत महिला,  विधवा,  भुमीहीन शेतमजुर, अपंग व्यक्ती असलेले कुटूंब, अनाथ मुलाचे संगोपन करणारे कुटूंब यांना खावटी योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

जिल्ह‌्यामध्ये सन 2011-22 या आर्थिक वर्षामध्ये मनरेगा अंतर्गत 66.80 लक्ष मनुष्यदिवस निर्मीती झालेली असून पालघर जिल्हा मनुष्यदिवस निर्मीतीमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच आदिवासी कुटूंबांना रोजगार देण्यामध्ये पालघर जिल्हा हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून डहाणू विभागातील 23 शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना टॅब वाटप  करण्यात आले. त्यासोबत प्रत्येक आश्रमशाळा इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचे काम डहाणू विभागाने हाती घेतले असुन आता पर्यंत 09 शासकिय आश्रमशाळा  इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शाळांचे CCTV तसेच ऑनलाईन बैठका घेणे सुलभ होत आहे. उर्वरीत शासकिय आश्रमशाळांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू आहे.

डहाणू प्रकल्प कार्यालयाकडून आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना शाळेतच जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्याची मोहीम सुरु असून शाळेतच इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

पालघर जिल्हयामध्ये स्थलांतरित होऊन आलेल्या विटभट्टीवरील स्थलांतरीत व्यक्तींची प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहेत. जवळपास  400 विटभट्टीच्या ठिकाणी 25 हजार लाभार्थींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांची 100 टक्के अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमे अंतर्गत मोहिम कालावधीत एकूण 21 हजार 328 नविन लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला असून, त्यांना लाभ देण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 17 हजार 180 आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सदर मोहिम जिल्हयामध्ये व्यापक प्रमाणात राबविल्यामूळे सर्वसामान्य नागरीकांना त्याचा लाभ घेता आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनअंतर्गत 24 हजार 214 घरकुल बांधण्यात आली असून शबरी, रमाई आवास योजनेअंतर्गत 5 हजार 718 घरकुले बांधण्यात आली आहेत असे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

शबरी आवास योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांच्या 1516 लाभार्थ्यांना जिल्हास्तरावरून एका क्लिकवर एकाच दिवशी घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.जव्हार तालुक्यातील उन्नती प्रभागसंघातील 100 महिलांना गोट बँक या नाविण्यपुर्ण प्रकल्पाअंतर्गत फक्त 1100 रुपयांमध्ये 11 शेळया आणि 1 बोकड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पोषण पुनर्वसन केंद्र कार्यान्वीत असून या केंद्रामार्फत चालु वर्षात 480 कुपोषीत बालकांवर उपचार करण्यात आले आहेत.जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शहरी भागातील महिलांना 600 रुपये तसेच ग्रामीण भागातील महिलांना 700 रुपये वाटप करणेत येत असून चालू वर्षामध्ये 3 हजार 135 मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 1383 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क व विहित  शुल्क देण्यात येते.  सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 438 विध्यार्थ्यांना लाभ देण्यात आला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत चालू वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
*****