Home ताज्या बातम्या Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पूरसदृश परिस्थितीमुळे वाहतुकीत बदल

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पूरसदृश परिस्थितीमुळे वाहतुकीत बदल

0

पुणे : परवेज शेख

पवना, मुळशी ही धरणे पूर्णतः भरली असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आह. शहरातील वाहतूक खोळंबून याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पूरजन्य परिस्थितीमुळे सांगावी-औंध भागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे हा मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गाने जाऊ नये, असे सांगण्यात येत आहे. तसेच राजीव गांधी पुलापर्यंत पाणी पोहचले आहे.

जुनी सांगवी ते स्पायसर कॉलेज पुलापर्यंतचा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सांगवी मधील सावित्रीबाई फुले गार्डनt, कस्पटे चौक, वाकड नाका वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

काळेवाडी चौकाकडून मानकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

चाफेकर चौक ते मोरया गोसावी मंदिर आणि धनेश्वर मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

कुदळवाडी ते मोई हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

शेलपिंपळगाव येथे पाणी आले असल्याने काही भागातील वाहतूक बदलण्यात आली आहे.

शिक्रापूर ते चाकण हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

देहूरोडकडून मामुर्डी, सांगवडेकडे जाणाऱ्या लोखंडी पुलावर पाणी आले असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.