Home शहरे अकोला येत्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूरवासियांसाठी पुन्हा महातालवाद्य महोत्सवाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

येत्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूरवासियांसाठी पुन्हा महातालवाद्य महोत्सवाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

0
येत्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूरवासियांसाठी पुन्हा महातालवाद्य महोत्सवाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

कोल्हापूर दि ६ : – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले , कोल्हापूर ही कलेची , कलाकारांची नगरी आहे, येथे खऱ्या अर्थाने कलावंताच्या कलागुणांना वाव मिळतो म्हणूनच येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा रसिक कोल्हापूरवासियांसाठी महा – तालवाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली .
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातंर्गंत आयोजित खासबाग मैदान येथे महा – तालवाद्य महोत्सवात ते बोलत होते.


यावेळी मधुरिमा राजे छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, आ .पी. एन. पाटील , आ .राजू आवळे , आ .श्रीमती जयश्री जाधव , आ .जयंत आसगावकर ,चित्रनगरीचे संचालक संजय पाटील, सांस्कृतिक कार्य संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते .
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या महा -ताल संगीत महोत्सवात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत आपली कला सादर करीत असून हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून खासबाग मैदानात सुरू असलेल्या या संगीत मेजवानीचा कोल्हापूरकरांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी पद्मश्री शिवमणी यांनी त्यांचा अद्‌भूत , अतुलनीय असा ‘ सिवामणी ट्रायो ‘ हा संगीत कला अविष्कार सादर केला .त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी ,त्यांची संगीत वाद्ये हाताळण्याची शैली पाहण्यासाठी रसिकांनी खासबाग मैदानावर हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती .आज ( शनिवार ) खासबाग मैदान येथे प्रख्यात वादक तौफीक कुरेशी यांचा कार्यक्रम होणार आहे . या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कोल्हापूरकरांनी हजेरी लावावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले .
000