Home बातम्या ऐतिहासिक राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

0
राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

नवी दिल्ली दि. 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिन  पाळण्यात आला .

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निरूपमा डांगे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली.

याचबरोबर महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

००००

वि.वृ.क्र. 78  /दि. 20.05.2022