Home शहरे अकोला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अंशू सिन्हा यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अंशू सिन्हा यांची मुलाखत

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात अंशू सिन्हा यांची मुलाखत

मुंबई, दि. 20 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 21 मे  व सोमवार 23 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गावे स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर व्हायची असतील तर ग्रामोद्योगाला विशेष बळ देणे आवश्यक आहे.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ हेच कार्य नेटाने करत आहे. या मंडळाचे कार्य, त्याचे रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न, मधाचे गाव ही संकल्पना, भविष्यातील योजना याविषयी सविस्तर माहिती  अंशू सिन्हा  यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.