Home शहरे अकोला शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देऊ – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादितचे प्राधिकृत अधिकारी तथा विधानसभा सदस्यबाबासाहेब पाटील

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देऊ – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादितचे प्राधिकृत अधिकारी तथा विधानसभा सदस्यबाबासाहेब पाटील

0
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देऊ – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादितचे प्राधिकृत अधिकारी तथा विधानसभा सदस्यबाबासाहेब पाटील

मुंबई, दि 24 : शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेत टिकणारा विषमुक्त शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादितचे प्राधिकृत अधिकारी तथा विधानसभा सदस्य बाबासाहेब पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्राधिकृत अधिकारी बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य सहकारी पणन महासंघाचे सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, सरव्यवस्थापक (प्रशासन) प्रसाद ओक आदी उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, सहकारी पणन महासंघ शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वाजवी दरात शेती अवजारे, माफक दरात खते उपलब्ध करून देण्यासोबतच योग्यप्रकारे धान्य साठवण्यासाठी गोदामांच्या देखभाल दुरुस्तीवरही भर देण्यात येत आहे. दरम्यान ‘राज्याने गेल्या वर्षभरात विक्रमी धान खरेदी केली असून शेतकऱ्यांना किमान आधारभूत (मिनिमम सपोर्ट प्राइज) मिळवून देण्यासोबत शेतमालाला जास्तीत जास्त चांगला भाव मिळवून देण्यासाठी महासंघाने प्रयत्न केला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. तेलंग यांनी प्रास्ताविकात सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचा, विक्रमी कडधान्य खरेदी करणाऱ्या खरेदी व्रिकी सहकारी संघांचा, खत विक्री करणाऱ्या संस्थांचा तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

0000