Home अश्रेणीबद्ध प्रवाशाकडून एसटी चालकाला शिवीगाळ, मारहाण

प्रवाशाकडून एसटी चालकाला शिवीगाळ, मारहाण

0

पुणे:परवेज शेख

सीबीएस येथून पुण्याला जाणार्‍या एसटीमध्ये चालकाशेजारील सीटवर बसलेल्या प्रवाशास पाठीमागे बसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने त्याने एसटीचालक, वाहकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. काठे गल्ली सिग्नल, व्दारका येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी एसटीचालक रामराव साहेबराव चव्हाण यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी प्रवाशाला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अरबाज याकुब शेख (२०, रा. वडाळानाका) असे शिक्षा झालेल्याचे, तर रामराव साहेबराव चव्हाण (३३, रा.राजगुरुनगर,पुणे) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे

नवीन सीबीएस येथून एसटी (एमएच ०७, सी ७११७) पुण्याकडे जात असताना काठे गल्ली सिग्नल येथे थांबली. त्यावेळी प्रवासी अरबाज शेख एसटीचालकाच्या शेजारील सीटावर बसला. एसटीचालक रामराव चव्हाण यांनी त्याला पाठीमागे बसा, असे सांगितले. त्याचा राग अनावर झाल्याने त्याने चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली.वाहक शिवाजी खलुले व दोन प्रवासी मध्यस्थी झाले असता त्यांनाही प्रवासाने शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अरबाज शेखला अटक केली. शनिवारी (ता.३) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.