Home शहरे पुणे नातुबाग गणपती मंदिराची दानपेटी चोरणारे अटक

नातुबाग गणपती मंदिराची दानपेटी चोरणारे अटक

0

शहरातील इतर दोन मंदिरातील दानपेट्या चोरल्याचेही उघड 
पुणे:
बाजीराव रस्त्यावरील नातुबाग गणपती मंदिर व इतर दोन मंदिरांमधील दानपेट्यांची चोरी करणाऱ्यांस खडक पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी तीघांना अटक करुन त्यांच्याकडून दोन दानपेट्यांसह 22 हजार 538 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यांनी मौजमजेसाठी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
शाहरुख सलाउद्दीन खतीब(रा.काशेवाडी, भवानी पेठ), रमिज इक्‍बाल हकिम खान(रा.घोरपडी पेठ) आणी बिल्लाल गफुर शेख(रा.भवानी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 जुलै रोजी बाजीराव रस्त्यावरील साईबाबा गणपती मंदिराची दानपेटी चोरल्याची घटना घडली होती. तर 26 जुलै रोजी घोरपडे पेठेतील नवग्रह मारुती मंदिराची व 30 जुलै रोजी बाजीराव रस्त्यावरील नातुबाग गणपती मंदिराची दानपेटी चोरण्यात आली. या संदर्भात गुन्हे दाखल झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी गस्त वाढवून तपासासाठी सूचना दिल्या होत्या. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड हे प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल आशिष चव्हाण, दिपक मोधे, महावीर दानवे यांना दानपेटया चोरणाऱ्या तीन व्यक्ती सोनवणे हॉस्पिटल शेजारील बांधकामाच्या पार्किंगच्या जागेत थांबल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून तीघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साईबाबा मंदिर आणी नातुबाग मंदिराच्या चोरलेल्या दोन दानपेट्या (किंमत 15 हजार) व त्यातील 7,538 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. तर आरोपींनी नवग्रह मारुती मंदिराची दानपेटी धोबीघाट येथील कॅनोलमध्ये फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. या चोऱ्या आरोपींनी मौजमजा करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड व पोलीस कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, आशिष चव्हाण, महावीर दावणे, दिपक मोधे, इम्रान नदाफ, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, प्रमोद नेवसे, रवी लोखंडे, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.