Home बातम्या ऐतिहासिक ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. साधना तायडे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. साधना तायडे यांची मुलाखत

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. साधना तायडे यांची मुलाखत

मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात  आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे  यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 1 जून व गुरूवार 2 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.  वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

31 मे हा जगभरात तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करतात. तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे तंबाखू व्यसनाचे दुष्परिणामाबाबत  जनसामान्यांत जागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाने विविध कार्यक्रम सुरू केले आहेत.  तसेच या विषयी आरोग्य विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती डॉ. साधना तायडे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून  दिली आहे.