Home शहरे अकोला आईसलँडच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

आईसलँडच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

0
आईसलँडच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई, दि. 1 : आईसलँडचे भारतातील राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

भारत आणि आईसलँड भूऔष्णिक ऊर्जा निर्मिती या विषयावर सहकार्य करीत असून या संदर्भात टास्क फोर्स देखील नेमण्यात आला असल्याचे, राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी सांगितले. भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांना देखील आपण भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ ऊर्जा क्षेत्राशिवाय आईसलँड भारताशी सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

आईसलँड येथे भारतीय योग लोकप्रिय असून आपल्या देशाला योग प्रशिक्षकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आईसलँड येथील विद्यापीठात हिंदी विषयाचे अध्यापन सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने उच्च शिक्षण क्षेत्रात आईसलँडशी सहकार्य करण्यास महाराष्ट्राला निश्चितच आवडेल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आईसलँड येथील विद्यापीठांमधील अध्यापकांनी राज्यातील विद्यापीठांना भेट द्यावी, अशीही अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला आईसलँडचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत गुल कृपलानी हे देखील  होते.

००००

Iceland Ambassador calls on Maharashtra Governor

Mumbai 1 : The Ambassador of Iceland to India Gudni Bragason met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Matters of mutual interest including enhancing cooperation in the areas of Clean Energy, Higher Educational and Culture were discussed.

Speaking on the occasion, the Iceland Ambassador said his country is keen to enhance cultural relations with Maharashtra. Governor Koshyari said in his capacity as Chancellor of public universities in Maharashtra, he would welcome cooperation with Iceland in the area of higher education and faculty exchange.

The Honorary Consul of Iceland in Mumbai Gul Kripalani was also present.

0000