Home शहरे अकोला बोईसर येथे राज्य कामगार विमा सोसायटीचा सेवा दवाखाना सुरु

बोईसर येथे राज्य कामगार विमा सोसायटीचा सेवा दवाखाना सुरु

0
बोईसर येथे राज्य कामगार विमा सोसायटीचा सेवा दवाखाना सुरु

मुंबई दि, 2 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाने विविध योजना घोषित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय, मुंबई विभागामार्फत बोईसर जि. पालघर येथेठक्कर सिटी, एस. टी. स्टॅन्ड जवळ विमा कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी, याकरीता गुरुवार दि. 26 मे रोजी सेवा दवाखाना सुरु करण्यात आला. खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 124 नवीन सेवा दवाखाने सुरु केले जाणारआहेत.  तारापूर औद्योगिकवसाहतीचे सदस्य महेंद्र सिंग यांनी विमाधारकांकरीता वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्याबाबत समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास प्रशासनअधिकारी डी. एस. भगत, रा. का. वि. महामंडळाचे डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, पालघर स्थानिक कार्यालयातील पी. कुमार, डॉ. हार्दीक हलपत्ती, अभिजीत मोकल, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक उपस्थित होते. मुंबई विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. कश्यप द्विवेदी यांनी आभार मानले.

000

सुखदेव नारायणकर/उपसंपादक/2.6.22