Home शहरे अकोला राज्यपालांकडून एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे अभिनंदन

राज्यपालांकडून एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे अभिनंदन

0
राज्यपालांकडून एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे अभिनंदन

मुंबई, दि. 14 : मूळच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील लोंथरु गावच्या गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी जगातील सर्वात मोठे शिखर माऊंट एव्हरेस्ट तसेच पाचवे मोठे शिखर माउंट मकालू यशस्वी सर केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना कौतुकाची थाप दिली.

पंचवीस वर्षांच्या सविता कंसवाल यांनी दिनांक 12 मे रोजी माऊंट एव्हरेस्ट तर 28 मे रोजी मकालू शिखर सर केले. अशा प्रकारे अवघ्या सोळा दिवसांच्या फरकाने दोन मोठी गिरीशिखरे सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. सविता कंसवाल यांनी सोमवारी राज्यपालांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आपल्या विक्रमाची माहिती दिली.

०००००

 

Governor Koshyari congratulates Everest conqueror Savita Kanswal

 

Mumbai 14 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari congratulated Savita Kanswal, ace Mountaineer for successfully conquering the world’s two highest peaks – Mt. Everest and the fifth highest peak Mount Makalu. Savita Kanswal, 25, hails from village Lothru in Uttarkanshi district of Uttarakhand.

Savita Kanswal climbed Mt Everest on 12th May and reached Mt Makalu on 28th May thereby becoming the first Indian woman to conquer two of the most challenging mountains within a span of 16 days. Savita met Governor Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday where she apprised him of his achievements.

000