मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार, दि. १६ जून २०२२ रोजी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
राज्य शासन कृषि क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. आपला शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा, त्यातून राज्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य शासन आग्रही आहे. केवळ पावसावरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. खरीप हंगामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन यावे, यासाठी कृषी विभागाने अतिशय काटेकोर नियोजन केले आहे. याच नियोजनाविषयी आणि एकूणच कृषि विभागाच्या विविध योजना आणि त्यातून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांविषयी कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सविस्तर माहिती ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००