Home बातम्या ऐतिहासिक संत कबीर जयंतीनिमित्त ‘दास्तान ए कबीर’ संगीत मैफल संपन्न

संत कबीर जयंतीनिमित्त ‘दास्तान ए कबीर’ संगीत मैफल संपन्न

0
संत कबीर जयंतीनिमित्त ‘दास्तान ए कबीर’ संगीत मैफल संपन्न

मुंबई दि, १७ : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ व्या शतकातील महान संत कबीरदास यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १४ जून, २०२२ रोजी सायंकाळी ‘दास्तान ए कबीर’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम म्हैसूर असोसिएशन ऑडिटोरियम, माटुंगा येथे संपन्न झाला.

त्यात संत कबीरदास यांचे दोहे गीत संगीतच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच संत कबीरदास यांच्या जीवनकार्यास देखील उजाळा देण्यात आला. किरदार आर्ट अकादमी द्वारा निर्मित या संगीत मैफलीचे संकल्पक व निर्देशक इकबाल नियाजी हे होते. दास्तानचे लेखन डॉ. नाज खान यांनी केले. या दास्तानचे सादरीकरण डॉ. नाज आणि शिव शर्मा यांनी केले. याचे संगीत संयोजन हे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त वरिष्ठ संगीतकार कुलदीप सिंघजी यांचे होते. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे सदस्य सचिव व सहनिर्देशक सचिन निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले.

000