Home ताज्या बातम्या पालक सचिव नितीन गद्रे यांची खानापूर चित्ता, केसापूर, बळसोंड, दाटेगावला भेट – महासंवाद

पालक सचिव नितीन गद्रे यांची खानापूर चित्ता, केसापूर, बळसोंड, दाटेगावला भेट – महासंवाद

0
पालक सचिव नितीन गद्रे यांची खानापूर चित्ता, केसापूर, बळसोंड, दाटेगावला भेट – महासंवाद

हिंगोली (जिमाका), दि. 08 :    राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) तथा हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांनी आज हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता, केसापूर, बळसोंड आणि दाटेगावला भेट दिली.

यावेळी त्यांनी खानापूर चित्ता येथील बळीराम जाधव या शेतकऱ्याच्या शेतावरील सोयाबीन पिकाची बेडवर टोकन पध्दतीने लागवड केलेल्या प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली. केसापूर येथे भानुदास टेकाळे या शेतकऱ्यांच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिकेला भेट देऊन पाहणी केली. बळसोंड येथील त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीला भेट देऊन तेथील धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिटची पाहणी केली. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय स्तरावर प्रथम आलेल्या दाटेगाव येथील ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यावेळी श्री. गद्रे यांच्या हस्ते थोडेसे मायबापासाठी या उपक्रमांतर्गत छत्री व बॅटरीचे वितरण करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, आत्माचे प्रकल्प संचालक शहारे, तहसीलदार नवनाथ वगवाड, तालुका कृषी अधिकारी गोविंद बंटेवाड, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्यासह संबंधत गावातील नागरिक उपस्थित होते.

******