Home ताज्या बातम्या सुमारे ११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

सुमारे ११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

0
सुमारे ११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

मुंबई, दि. २० : खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या  करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त करुन १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी आज अटक केली आहे.

सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी मे. पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ९९.२७ कोटी रुपयांची खोटी खरेदीची बिजके प्राप्त केली आहेत. त्यातून या व्यक्तीने शासनाची सुमारे १७.८७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम२०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे.      या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी डॉ. विद्याधर जगतापसहाय्यक राज्यकर आयुक्त हे मोहन चिखलेराज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी  अनिल भंडारी (भा.प्र.से)सहआयुक्तअन्वेषण-क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यवाहीसाठी प्रशांत खराडे आणि  श्रीकांत पवार या सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि इतर राज्यकर निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या अटकेसह आर्थिक वर्षातील सलग २८ अटक कारवाया महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने केल्या आहेत.

00000

प्रवीण भुरके/उपसंपादक/20.7.22

ONE ARRESTED IN GST SCAM WORTH AROUND RS. 117.14 CRORE

 

Mumbai, 20th July : Investigation was conducted in case of M/s. Pakiza Steels LLP and M/s Mayel Steels Private Limited as a part of a special operation launched by the Maharashtra Government against taxpayers involved in fake invoices. During the investigation, it was noticed that Shri Sayed Tauqeer Hasan Rizvi (Partner) of  M/s. Pakiza Steels LLP and director of M/s Mayel Steels Private Limited in this case, had claimed purchases of Rs. 99.27 Cr. and claimed Input tax credit  of Rs 17.87 crore without receiving any  goods or services and the same was adjusted against his output tax liability. 

During the investigation, it was found that  Shri Sayed Tauqeer Hasan Rizvi is the  Director/Partner in this case. Shri Sayed Tauqeer Hasan Rizvi received input tax credit of Rs.17.87 cores in 2 companies.  By this means the person has caused revenue loss of Rs.17.87 Cr. to the Government Exchequer.  In this case, input tax credit is claimed from Non-genuine taxpayer, the provisions of the Maharashtra Goods and Services Tax Act 2017 have been violated. Therefore, Shri Sayed Tauqeer Hasan Rizvi has been arrested by Maharashtra Goods and Services Tax Department on 20/07/2022. The act of the person is cognizable and non-bailable offence and is liable to imprisonment under the Goods and Services Tax Act, 2017. The person has been remanded to judicial custody till  03/08/2022 by the Hon’ble Additional Chief Metropolitan Magistrate’s Court.

Investigating Officer, Shri. Vidhyadhar Jagtap, Assistant Commissioner of State Tax is conducting further investigation in this case under the guidance of Shri.Mohan Chikhale, Deputy Commissioner of State Tax. Special guidance was given by  Shri. Anil Bhandari (IAS), Joint Commissioner of State Tax, Investigation – C for this case.  Shri.Prashant Kharade and Shri. Shrikant Pawar,  Assistant Commissioner State Tax and other State Tax Inspectors actively participated in this action. With this 28th arrest action in this financial year, the Maharashtra Goods and Services Tax Department has once again issued a stern warning to the tax evaders.

000