डोंबिवलीचा सुपरमॅन म्हणून हा व्हिडिओ भलताच गाजतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून डोंबिवलीचा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. व्हिडिओमधील प्रवासी चक्क लोकलमध्ये घुसण्यासाठी भलताच प्रयत्न करतो; मात्र त्याचा प्रयत्न असफल होतो. प्रचंड गर्दीसुद्धा स्थानकात असून हा प्रवासी आपल्या जिवाची पर्वा न करता चढण्याचा प्रयत्न करतो आहे.