Home बातम्या राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या! भाजप खासदाराची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या! भाजप खासदाराची मागणी

0

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 5 ऑगस्टला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेतला. संविधानातील कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीर भागाला देण्यात आलेले विशेषाधिकार काढून घेण्यात आले. यामुळे येत्या काळात अनेक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या धाडसी निर्णयासाठी मोदी सरकारवर अनेक ठिकाणांहून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गुमानसिंह दामोर यांनी मोदी यांना युगपुरुष असल्याचं म्हणत त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे लोकसभेतील Zero Hour दरम्यान दामोर यांनी ही मागणी उपस्थित केली होती. यावेळी त्यांनी “नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत इतक्या मोठ्या निर्णयासाठी कौतुक केले. तसेच मोदी हे युगपुरुष आहेत देशविदेशाने त्यांचा गौरव केला आहे. आजही काश्मीरसंबंधी निर्णय घेऊन त्यांनी कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत, त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी दामोर यांनी केली आहे.