Home ताज्या बातम्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डाॅ.धनंजय परकाळे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डाॅ.धनंजय परकाळे यांची मुलाखत

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डाॅ.धनंजय परकाळे यांची मुलाखत

मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डाॅ.धनंजय परकाळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट, शनिवार दि. ६ ऑगस्ट आणि सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक महेश जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कृषि क्षेत्रात पशुधनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पशुधन ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीची जोपासना करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थचक्रामध्ये पशुधनाचे महत्त्व, पशुंना वैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे धोरण, योजना आणि कार्यप्रणाली, पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्याबाबत उपाययोजना, बैलगाडा शर्यत इत्यादी विषयी माहिती डाॅ.परकाळे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिलीआहे.
000000