सोलापूर, दि. 05 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासन परिपत्रक दिनांक 20 जुन 2022 अन्वये सर्व देशभर दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आलेले आहे. त्याअनुषंगाने सांगोला शहरात दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी प्रभात फेरीचे आयोजन करणेत आलेले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविणे कामी सांगोला शहरामधील नागरिकांना “हर घर तिरंगा” विषयी माहिती देणे व मोठया प्रमाणात जनजागृती करणेसाठी प्रभात फेरीचे आयोजन करणेत आलेले होते.
प्रभात फेरी मध्ये सांगोला शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये अभिजित पाटील तहसिलदार सांगोला, किशोर बडवे नायब तहसिलदार, आनंद लोकरे गट विकास अधिकारी, शिवाजी शिंदे तालुका कृषि अधिकारी, कैलास केंद्रे नगरपालिका मुख्याधिकारी, आनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सांगोला, व्हि. डी. वाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगोला, तसेच सांगोला परिक्षेत्र कार्यालयातील क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.
प्रभात फेरी ही विदयामंदीर प्रशाला सांगोला ते वासुद चौक सांगोला पर्यत काढणेत आलेली होती, असे उपवनसंरक्षक, सोलापूर वन विभाग सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
जिल्ह्यातील नोंदीत दुकाने, आस्थापनानी राष्ट्रीय ध्वज लावण्याचे आवाहन
सोलापूर, दि. 05 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम १३ ऑगस्ट ते 15 ऑगस्टअखेर व्यापक प्रमाणात राबविण्याबाबत शासनाचे निदेश आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व नोंदीत दुकाने व आस्थापना यांनी राष्ट्रीय ध्वज आस्थापनेच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने केले आहे.
हा उपक्रम राबवताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे व जाणते अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी जाणीवजागृती निर्माण करुन घेण्याची विशेष काळजी घावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000