Home शहरे अकोला ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी.

‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी.

0
‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी.

नागपूर, दि. 05 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान नागपूर विभागात ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गंत विभागातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापना आणि घरांवर सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असून, नागरिकांनीही या कालावधीत राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवून सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज येथे केले.

 विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माहिती संचालक हेमराज बागुल, उपायुक्त आशा पठाण आदी अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरित करावे. भारतीय ध्वजसंहितेचे पालन करावे व राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. केंद्रीय गृह विभागाच्या 31 डिसेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार ध्वजसंहितेत बदल करण्यात आला असून, त्यानुसार सर्वांनी अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

नागपूर विभागात विविध आस्थापना, घरांची संख्या  28 लक्ष 83 हजार 649 इतकी असून, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण 3,72,262, महापालिका 6,28,245अशी एकूण 10 लक्ष 507, वर्धा 3,30,833, भंडारा 3,16,662, गोंदयिा 3,55,594, चंद्रपूर ग्रामीण 3,97,034 आणि महापालिका 1,84,615असे एकूण 5,81,649, आणि गडचिरोली जिल्ह्यात 2,98,404 आस्थापनांचा समावेश आहे. तसेच विभागात 24 लाख 67 हजार 718 तिरंगा ध्वजांची मागणी असून, नागपूर ग्रामीण 3,72,262, महापालिका तीन लक्ष अशी एकूण 6 लक्ष 72 हजार 262, वर्धा 3,30,833, भंडारा 3,16,640, गोंदिया 3,55,594,चंद्रपूर ग्रामीण 3,50,734, महापालिका 1,43,251 अशी एकूण 4,93,985  आणि गडचिरोली जिल्ह्यात 2,98,404 राष्ट्रध्वजांची मागणी आहे.

विभागातील सर्व जिल्ह्यांना 23 लाख, 45 हजार 146 राष्ट्रध्वज तिरंगा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये नागपूर ग्रामीण 2,72,262, महापालिका तीन लक्ष असे एकूण 5,72,262, वर्धा 3,30,833, भंडारा 2,94,068, गोंदिया 3,55,594 चंद्रपूर ग्रामीण 3,50,734, महापालिका 1,43,251 असे एकूण 4,93,985 आणि गडचिरोली जिल्ह्यात 2,98,404 राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच केंद्र शासनाकडून 1 लाख 22 हजार 572 तिरंगा ध्वज हे मागणी केल्यानुसार सशुल्क प्राप्त होणार आहेत. त्यामध्ये नागपूर ग्रामीणसाठी एक लक्ष, भंडारा 22 हजार 572 आणि गडचिरोली ग्रामीणसाठी  एक लक्ष 22 हजार 572 उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सव्वालाख ध्वज वितरीत करण्यात आले असून, त्यामध्ये नागपूर ग्रामीणसाठी एक लक्ष तर भंडारा जिल्ह्यासाठी  25 हजार तिरंगाचा समावेश असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

विभागातील आस्थापना

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गंत विभागात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, रुग्णालये, औषधालये, सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 26 हजार 620 विविध आस्थापना असून, नागपूर 6 हजार 152, वर्धा 4 हजार 360, भंडारा 3 हजार 238, गोंदिया 3 हजार 812, चंद्रपूर 3 हजार 908 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 5 हजार 150 आस्थापनांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

विभागामध्ये 17 लाख 97 हजार 675 राष्ट्रध्वज सशुल्क मिळणार आहेत. यामध्ये नागपूर जिल्हा 25, वर्धा 40, भंडारा 30, गोंदिया 32, चंद्रपूर 25 आणि गडचिरोली जिल्ह्यात 20 रुपये प्रती ध्वज असा 3 :2 या आकारातील  राष्ट्रध्वजांचा दर राहणार आहे. बचत गट, ग्रामपंचायत निधी, आपले सरकार सेवा केंद्र व शासनाकडून  12 लाख 68 हजार 656 तिरंगा सशुल्क तर उर्वरित 5 लक्ष 29 हजार 19 हे देणगी स्वरुपात प्राप्त होणार असल्याचे राधाकृष्णन बी यांनी सांगितले.

 तिरंगा विक्री केंद्र

नागपूर विभागात विविध ठिकाणी तिरंगा विक्री करण्यात येणार असून, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका विभाग, पंचायत समिती, शाळा, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उमेद, स्वस्त धान्य दुकान, वर्धीनी केंद्र अशा एकूण 4 हजार 471 केंद्रांवर तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका 808, पंचायत समिती 13, ग्रामसंघ 13 असे एकूण 834, वर्धा ग्रामपंचायत, नगर परिषदमध्ये 181 आणि वर्धीनी केंद्र 8 असे एकूण 189, भंडारा 264, गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगर परिषद 11, उमेद 650, स्वस्त धान्य दुकान 998 असे एकूण 1659, चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका 845, प्रभाग संघ 55 असे एकूण 900 आणि गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगर परिषद 575, शाळा 50 अशा एकूण 625 विक्री केंद्रांचा समावेश आहे.

सर्व नागरिकांनी काय करावे…

राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल, याची दक्षता घ्यावी.

  • राष्ट्रध्वज हाताने कातलेला,हाताने बनविलेला किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क व खादी यापैकी कापडापासून तयार केलेला असावा.
  • राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असेलव झेंड्याची लांबी व रुंदी 3:2 या प्रमाणात राहील.
  • 20 जुलै 2022 च्या शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रध्वज दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी फडकविताना दररोज सायंकाळीखाली उतरविण्याची आवश्यकता नाही. परंतु कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल.
  • राष्ट्रध्वज फडकविताना केशरी रंग आकाशाकडे वर असावा आणि हिरवा रंग जमिनीच्या दिशेने खाली असावा.
  • राष्ट्रध्वज चढविताना लवकर चढवावा व उतविताना सावकाश उतरवावा.
  • जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याहीपद्धतीने तो खाजगीरित्या संपूर्णपणे नष्ट करावा.
  • राष्ट्रध्वजाच्या  दोन्ही बाजूस समान पांढऱ्या पट्टीच्या पूर्णत: मध्यभागी 24 आऱ्यांचे गर्द निळ्या रंगाचे अशोक चक्र दिसेल असा ध्वज असावा.

***