नवी दिल्ली, दि.12 : गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
गोव्यामधील ‘इन गोवा’ या 24 तास चालणाऱ्या मराठी आणि इंग्रजी वाहिनीचे सल्लागार संपादक श्री. ढगे यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी परिचय केंद्राच्या जनसपंर्क अधिकारी तथा उपसंचालक (माहिती) (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री ढगे यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.
यावेळी श्री ढगे यांनी संपादित केलेले ‘भाई ॲड. रमाकांत खलप अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ’ श्रीमती अरोरा यांना भेट स्वरूप दिले. श्री. ढगे गोव्यातील नामांकित ‘इन गोवा’ या 24 तास चालणाऱ्या मराठी आणि इंग्रजी वाहिनीचे सल्लागार संपादक म्हणून काम बघतात. त्यांची आतापर्यंत 12 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
श्रीमती अरोरा यांनी परिचय केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन तसेच नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गतही राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती श्री. ढगे यांना दिली. श्री. ढगे यांनी परिचय केंद्राच्या वतीने दिल्लीतून होणाऱ्या कामाचे कौतुक केले. यावेळी श्री. ढगे यांनी परिचय केंद्राच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानासाठी शुभ संदेश दिला.