Home शहरे अकोला मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जुने कस्टम हाऊस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी सर्वश्री रविंद्र राजपूत, कल्याण पांढरे, शिवाजी पाटील, भागवत गावंडे, श्रीमती स्वाती कारले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते शहीद सैनिक परवेज रुस्तम जमास्जी यांच्या वीर पत्नी श्रीमती झरीन पी. जमास्जी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या  के.जे. सोमय्या हॉस्पिटलचे डॉ. डिसुझा, के. ई. एम. हॉस्पिटलचे डॉ. विश्वनाथ धूम, टाटा हॉस्पिटलचे डॉ. उमेश दवरे, एल. टी. एम. जी हॉस्पिटलचे डॉ.अनिल मोरे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत सागर माने (प्रथम क्रमांक), निलेश इटणारे (द्वितीय क्रमांक), सविता बरडे (तृतीय क्रमांक), रवींद्र शिंगाडे (उत्तेजनार्थ) व  वक्तृत्व स्पर्धेत सागर माने (प्रथम क्रमांक), दीपक वळसंगे (द्वितीय क्रमांक), वैशाली किवलकर (तृतीय क्रमांक), सोनल पाटील (उत्तेजनार्थ) या विजयी झालेल्या कर्मचाऱ्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रथम गुरव (ज्युदो), याशिका शिंदे (नेमबाजी), रविकांत काळे (बॉक्सिंग) यांनाही गौरवण्यात आले. कोविड महामारीच्या काळात बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री.निवतकर म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आपण विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले. आपण देशाभिमान कायम जागृत ठेवावा. आपण एक आहोत आणि एकीच्या तत्त्वावर देश पुढे नेवूया ही या अभियानामागची संकल्पना आहे. आपण दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात ‘घरो घरी तिरंगा’ हे अभियान राबविले.  तिरंगा वर्षभर आपल्या मनात असावा, असेही ते म्हणाले. तहसिलदार आदेश उफळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

०००