Home बातम्या ऐतिहासिक भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात झाले ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात झाले ध्वजारोहण

0
भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात झाले ध्वजारोहण

नाशिक, दिनांक 15 ऑगस्ट, 2022(जिमाका वृत्तसेवा): स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भीमराज दराडे, वासंती माळी, गणेश मिसाळ, नीलेश श्रींगी, स्वाती थविल, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, तहसीलदार राजश्री अहिरराव, अनिल दौंडे, प्रशांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.

000