Home ताज्या बातम्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे पुणे येथील राजभवनात चहापान

स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे पुणे येथील राजभवनात चहापान

0
स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे पुणे येथील राजभवनात चहापान

पुणे, दि. 16 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन पुणे येथील हिरवळीवर सोमवारी पारंपरिक स्वागत समारोह व चहापानाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. राज्यपालांनी सर्व निमंत्रितांशी संवाद साधला व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.  चहापानाचे आयोजन 4 वर्षानंतर करण्यात आले.

स्वागत समारोहाला खासदार गिरीश बापट, माजी आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुरलीधर मोहोळ, नॅकचे अध्यक्ष भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ कारभारी काळे, प्रकुलगुरु डॉ संजीव सोनवणे, अभिनेते विक्रम गोखले, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ शां. ब. मुजुमदार, सशस्त्र सैन्यदलाचे अधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, उद्योजक, प्रशासन तसेच पोलीस सेवेतील अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Independence Day: Governor Koshyari hosts At Home Reception at Pune Raj Bhavan

Governor Bhagat Singh Koshyari hosted the traditional At Home Reception for the distinguished invitees on the occasion of the Platinum Jubilee of India’s Independence Day on the lawns of Raj Bhavan Pune on Monday (15th Aug). The Reception was hosted after a gap of 4 years.

The Reception was attended by MP Girish Bapat, former MLA Medha Kulkarni, Mayor Murlidhar Mohol, NAAC Chairman Bhushan Patwardhan, Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr Karbhari Kale, Pro Vice Chancellor Dr Sanjeev Sonavane, Actor Vikram Gokhale, Symbiosis Founder Dr S B Mujumdar, officers of Armed Forces, doctors, journalists, industrialists, officials of police and public administration and eminent citizens.