मुंबई,दि.१६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आज, मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंक वर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
या मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘समूह राष्ट्रगीत गायन’ ही संकल्पना, या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न याबद्दल उपसचिव श्री. थोरात यांनी सविस्तर माहिती दिली आहे.