बीड दि.20 :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे चेमरी विश्रामगृह येथे आगमन झालेपासून, याठिकाणी परळी बरोबरच बीड जिल्ह्यातील विविध भागातून व शहरातून आलेले सामाजिक, राजकीय , सहकार, कामगार , वैद्यकीय, शिक्षण आदी क्षेत्रातील व्यक्ती संघटनांचे प्रतिनिधी , पदाधिकारी व नागरिक यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिली . राज्यपाल महोदय परळी येथे मुक्कामी असल्याने काल उशिरापर्यंत व आज सकाळी प्रयाण होण्यापूर्वी त्यांच्या राजशिष्टाचार विषयक नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने नागरिक त्यांना भेटत होते.
यामध्ये क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे माजी उपाध्यक्ष दिलीपराव आगळे, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, वैजनाथ जगतकर, संदीप लाहोटी, माजी नगरसेविका उमाताई समशेट्टे, डाॅ. शालिनी कराड, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे, शहराध्यक्षा सुचिता पोखरकर, संपादक आत्मलिंग शेटे , वंचित बहुजन आघाडी, रोजंदारी मजदूर सेना, पेन्शनर असोसिएशन यासह भाजप, मनसे आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी त्यांची भेट घेतली.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ उपस्थिती होती.
दोन दिवसीय बीड जिल्हा दौरा आटोपून गोपीनाथ गड येथे भेट दिल्यानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी पुढील कार्यक्रमांसाठी लातूरकडे प्रयाण केले.
000