प्रतिनिधी: शफीक शेख
भिवंडी तालुक्यातील कोनगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शक्ती कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवला जात असल्याची खबर एपीआय एन.पी.सूर्यवंशी यांना मिळाल्याने त्यांनी काल रात्री पोलीस पथकासह छापा टाकला असता त्या ठिकाणाहून २५ हजार ३५० हुक्का पार्लरच्या साहित्यासह दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सोहेल गफार शेख ( २३ रा.कोनतरी ) व सूरज चंद्रकांत मुकादम ( २४ रा.पिंपळास रोड ,कोनगांव ) असे अटक केलेल्या हुक्का पार्लर चालकांची नांवे आहेत.या दोघांनी स्टायला फर्निचर दुकानालगत शिवशक्तीनगर येथे बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरु केले होते.या पार्लरमध्ये विविध सुगंधी तंबाखूच्या फ्लेवरचे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते.त्यामुळे नशा येणाऱ्या तंबाखूचे झुटके घेण्यासाठी या ठिकाणी शाळा ,महाविद्यालयातील विद्यार्थी देखील गर्दी करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून १४ हुक्का पॉट ,पाईप ,चिलीम व ८ वेगवेगळे फ्लेवर बॉक्स आणि ६ खुर्च्या असा २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय एन. पी. सूर्यवंशी करीत आहे.