मुंबई, दि. १३: देशभरात बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीगृह येथे आज सदिच्छा भेट घेतली. राहीबाई यांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद असून त्यांनी जैविक शेतीला एका वेगळ्या स्तरावर पोहोचविले असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ श्रीमती पोपेरे या गावरान वाण जपत त्याच्या बिया संकलित करण्याचे काम करत आहे. स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून देशी पिके पिकविणाऱ्या पोपेरे यांनी अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून जैविक शेतीला चालना दिली आहे.
या सदिच्छा भेटीवेळी ममताबाई भामरे, योगेश नवले आणि डॉ. राजश्री जोशी उपस्थित होते.