Home बातम्या ऐतिहासिक विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0
विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ठाणे दि. 15 (जिमाका) : प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड निवड ही वेगवेगळी असते.त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी  यांनी आज येथे केले.

आर्य समाज ,वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी  राजस्थानमधील खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वती, विवेकानंदजी परिव्रजक, राजकुमार दिवाण,धर्मवीर शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हिंदी विषयामध्ये प्राविण्य मिळवलेल्या नेरुळ येथील डी .ए.व्ही पब्लिक  स्कूलचे विद्यार्थी नमन ठाकूर,कुमार दिव्यम झा, वंशिका चंद,सान्वी शरण, तसेच वाशीच्या फादर अग्नेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सिध्देश रुपेश काळे,  वाणी कौर चोपरा, वाशी इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आर्यन कृष्णप्रसाद,एपीजे स्कूल नेरुळच्या संहिता रंगराजन, एपीजे स्कूल नेरुळच्या विद्यार्थी अनंतजीत पांडे, डी .ए.व्ही. पब्लिक  स्कूल,पनवेलच्या विद्यार्थीनी ईशा जाधव यांचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की,आपण सर्वांनी शिक्षित होऊन सुसंस्कृत होणे गरजे आहे.आपण किती ही मोठे झालो तरी आपल लक्ष भारतमातेकडे असणे गरजे आहे. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी भाषा समजते. हिंदी भाषेचा कोणताही प्रचार न करता विस्तार होत आहे. ही भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते. त्याबरोबरच आपण राहत असलेल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा शिकणे गरजेचे आहे, असेही श्री.कोश्यारी यावेळी यांनी सांगितले.

000