Home बातम्या ऐतिहासिक नाशिक विभागात प्रलंबित अर्ज, तक्रारींचा होणार निपटारा – विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे – महासंवाद

नाशिक विभागात प्रलंबित अर्ज, तक्रारींचा होणार निपटारा – विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे – महासंवाद

0
नाशिक विभागात प्रलंबित अर्ज, तक्रारींचा होणार निपटारा – विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे – महासंवाद

नाशिक, दि. 16 सप्टेंबर,2022 (विमाका वृत्तसेवा): नाशिक विभागात 17 सप्टेंबर ते 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा/यासाठी ‘सेवा, पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र,  विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर दि. 10 सप्टेंबर, 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

विविध विभागांच्या 14 सेवांचा समावेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे,  प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या  लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून),दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे/अशा सेवांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्ह्यात हा पंधरावडा अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे श्री गमे यांनी सांगितले.

****