मुंबई, दि. 26 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-400012 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. त्यानुषंगाने गुंतवणूकवृद्धी (Investment Promotion) व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District one Product) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली ही कार्यशाळा आणि प्रदर्शन असणार आहे.
कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत निर्यातीकरिता नियम, बँकेचा सहभाग, उद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना व माहिती, निर्यातीकरिता राज्य व केंद्र शासनाच्या विविध तरतूदी, तज्ज्ञ निर्यातदारांचे अनुभव कथन तसेच सदर चर्चासत्रांकरिता निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक सवलती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
या एक दिवसीय कार्यशाळा तसेच दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता दि. 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत उपस्थित रहावे, असे जिल्ह्यातील निर्यातदारांना आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरिता मर्यादित आसन व्यवस्था असल्याने आपल्या उपस्थितीबाबत उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, चेंबूर, मुंबई, या कार्यालयाच्या ई-मेल आयडी [email protected] तसेच या कार्यालयाच्या 022-25206199/25208182 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करावी, असे उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, मुंबई यांनी कळविले आहे.
000
अर्चना शंभरकर/विसंअ/26.9.22