अतिवृष्टीमुळे इंदापूर येथील समर्थनगर व साईनगर मधील रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसले; जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान
बोरघर / माणगांव: माणगांव तालुक्यातील इंदापूर तळाशेत येथील समर्थनगर येथील ४१ कुटुंबे आणि साईनगर येथील ५ कुटुंबे यांच्या घरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी घुसले. सदरची घटना ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. घडली. इंदापूर नदीचे पाणी इंदापूर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात शिरले आणि संपूर्ण इंदापूर येथील मुंबई-गोवा रस्त्यावर आले होते. याबाबतची माहिती माणगांवच्या उपविभागीय तथा दंडाधिकारी प्रशाली जाधव / दिघावकर मॅडम आणि माणगांव तहसीलदार प्रियंका अहिरे मॅडम यांना समजताच त्यांनी महसूल कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल होवून
त्यांनी ताबडतोब समर्थनगर व साईनगर येथील ४६ कुटुंबांना घरातून बाहेर काढून त्यांना तात्काळ तळाशेत येथील रा.जि. प. शाळेत सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले असून या कुटुंबामध्ये १७६ लोक आहेत. त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे.
सदर पिडीत राहिवाश्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे कपडे, धान्य व जीवनावश्यक वस्तू भिजून ओल्या चिंब झाल्या आहेत. त्यामुळे या राहिवाश्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई लवकरच मिळण्यासाठी इंदापूर तलाठी हे या रहिवाश्यांच्या घरातील नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. या राहिवाश्यांच्या मदतीसाठी दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख अनिल नवगणे, तळाशेत सरपंच दिनेश महाजन व ग्रामस्थ तत्परतेने धावून आले आणि पिडीतांना मदत केली.
























WhatsApp