Home शहरे अकोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई,दि. 2 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने सुरू होणाऱ्या ‘ हॅलो नव्हे, वंदे मातरम् बोला’ आणि स्वच्छतेविषयक ‘लेटस् चेंज’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याकरिता शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. सत्याग्रह सारखे अस्त्र दिले. विश्वाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवला. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आधुनिक भारताच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान आहे. ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने राष्ट्राभिमान जागवला. या महान विभूतींच्या त्याग, समर्पणाच्या शिकवणीतून राष्ट्र प्रगतीसाठी वचनबद्ध राहुया, हेच त्यांना विनम्र अभिवादन,’असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.

000