वर्धा, दि. 02 (जिमाका) : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज ईमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज झाले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, रणजित कांबळे, डॅा.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, मुख्य अभियंता संजय दशपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, अधीक्षक अभियंता सुषमा बोन्द्रे, कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, उपस्थित होते.
मान्यवरांनी नामफलकाचे अनावरण केल्यानंतर संपुर्ण ईमारतीची पाहणी केली. पालकमंत्र्यांचा कक्ष, जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचे कक्ष, नियोजन भवनाच्या सुसज्ज सभागृहांची त्यांनी पाहणी केली. 43 कोटी 11 लक्ष रुपये खर्च करुन ही ईमारत बांधण्यात आली आहे. भारतीय स्थापत्य शैलीत ईमारतीचे बांधकाम असून सार्वजनिक जागा वगळा संपुर्ण ईमारत वातानुकूलीत करण्यात आली आहे. अपंगांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे.
ईमारतीत 100 आसन क्षमतेचा बैठक कक्ष, पालकमंत्री व अधिकाऱ्यांचे सुसज्ज कक्ष आहेत. इमारतीच्या मागील भागात नियोजन भवनाची रचना करण्यात आली आहे. त्यात 300 व्यक्ती बसू शकतील अशी आसन व्यवस्था आहे. मुख्य अभियंता संजय दशपुते यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता सुषमा बोन्द्रे, कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी या सुसज्ज ईमारतीचे बांधकाम केले.
000