Home ताज्या बातम्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन – महासंवाद

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन – महासंवाद

0
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन – महासंवाद

सोलापूर, दि.4 (जिमाका) :- लकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सोलापुरातील विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जुना पुणे नाका चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री विखे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याबरोबर बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, पार्क चौकातील चार हुतात्मा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, भैय्या चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सुपर मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासही श्री. विखे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, अमोल शिंदे, प्रांतधिकारी हेमंत निकम, तहसीलदार जयवंत पाटील यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

चार हुतात्मा परिसर सुशोभिकरण शुभारंभ

पार्क चौकातील चार हुतात्मा परिसर जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या एक कोटी रुपये निधीतून विकसित करण्यात येणार आहे. आज पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

महापालिका आवारात मानपत्राचे लोकार्पण

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापूर पालिकेतर्फे मानपत्र देवून सन्मान करण्यात आला होता. या घटनेचे स्मरण म्हणून महापालिका आवारात कौन्सिल हॉलसमोर मानपत्राची कोनशिला बसविली आहे. त्याचे लोकार्पण पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचे दर्शन

महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज पहिल्यांदा सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दुपारी सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी हेमंत निकम आदीसह पदाधिकारी, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

देवस्थानतर्फे पालकमंत्री यांचा सन्मान

सिद्धेश्वर मंदिर देवस्थान पंच कमिटीतर्फे सचिव निळकंठ कोणापुरे, विश्वनाथ लब्बा आणि सुरेश म्हेत्रे यांनी पालकमंत्री श्री विखे-पाटील यांचा सन्मान केला.

बालकांनी केले टाळ्या वाजवून पालकमंत्री यांचे  स्वागत

पालकमंत्री श्री विखे-पाटील हे सिद्धेश्वर मंदिरातून सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन निघाले असता मंदिरात सहलीसाठी आलेल्या नूमवि मराठी शाळेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री त्यांच्या स्वागताने भारावून गेले. त्यांनी तिथे थांबून त्यांच्याशी इंग्लिशमधून संवाद साधला. व्हॉट इज युवर स्कूल नेम… तुम्ही कोणत्या शाळेत शिकता…यावर विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव सांगितले. अभ्यास चांगला करा, चांगली शाळा शिका असा सल्ला देवून विद्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटो काढून घेतला. यावेळी पदाधिकारी, अधिकारी, शाळेच्या शिक्षिका अर्चना जाधव उपस्थित होत्या.

00000