Home शहरे अकोला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून महानगरपालिका कामकाजाचा आढावा

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून महानगरपालिका कामकाजाचा आढावा

0
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून महानगरपालिका कामकाजाचा आढावा

मुंबई. दि.4 : राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास  मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य प्रकारे होत असून याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचा उल्लेख त्यांनी आजच्या बैठकी दरम्यान केला. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांच्या दृष्टीने राज्य शासनाच्या स्तरावर समन्वय साधण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांनी प्राधान्याने करावी, असे निर्देश देताना पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी पालकमंत्री महोदयांना व उपस्थित मान्यवरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांची व प्रकल्पांची माहिती यावेळी दिली.

बैठकीस उत्तर मुंबई मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई स्थानिक प्राधिकारी संस्थेचे विधान परिषदेतील आमदार  राजहंस सिंह, गोरेगांव विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती विद्या ठाकूर, वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर, विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. पराग अळवणी आदी  उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ/4.10.2022