इस्लामाबाद
जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्दबातल करण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयानंतर पाकिस्तानने बुधवारी मोठे निर्णय घेतले. हिंदुस्थानसोबत राजकीय संबंध तोडण्यासह द्विपक्षीय व्यापार बंद करण्यात आला. तसेच पाकिस्तान सरकारने हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश दिले असून हिंदुस्थानमधील आपल्या उच्चायुक्तांनाही माघारी बोलवले आहे
कलम 370 रद्द केल्यापासून अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने आकांडतांडव सुरू केला आहे. बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राजकीय संबंध तोडण्यासह द्विपक्षीय व्यापार बंद करणे, हा मुद्दा युएनमध्ये मांडणे, 14 ऑगस्टला कश्मीर नागरिकांसोबत कणखरपणे उभे राहणे, तसेच 15 ऑगस्टला काळा दिवस साजरा करणे असा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आला आहे.
























WhatsApp