मुंबई, दि. 10 : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
‘श्री मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते. व्यापक जनसंपर्क व संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संसदपटू असलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून उत्तम काम केले होते. आपण उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वीपासूनच आपला मुलायमसिंह यादव यांचेशी घनिष्ठ परिचय होता. सर्व पक्षातील लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला आहे. दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना श्री अखिलेश यादव तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कळवतो’’, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
००००
“Mulayam Singh Yadav was a stalwart in UP politics”
– Governor Bhagat Singh Koshyari
Mumbai Dated 10 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of former UP Chief Minister and veteran Samajwadi Party leader Mulayam Singh Yadav. In a condolence message, Governor Koshyari said:
“Shri Mulayam Singh Yadav was a stalwart in the politics of the nation, and especially in that of Uttar Pradesh. He had a strong grip over politics because of his wider public relations and organisational skills. A good parliamentarian, Mulayam Singh created his own mark as Chief Minister of Uttar Pradesh and as Defence Minister of the country. I had the privilege of knowing Mulayam Singh ji intimately even before I became a member of the UP Legislative Council. He had friendly relations with people from across the political spectrum. In his demise, a major chapter in the politics of UP has come to an end. I pay my homage to the departed leader and convey my deepest condolences to Shri Akhilesh Yadav and other members of the bereaved family.”