Home ताज्या बातम्या इम्रान यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी केली भाजपची तुलना

इम्रान यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी केली भाजपची तुलना

0

लाहोर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार जम्मू काश्‍मीरसंदर्भातलं कलम 370 हटवण्यात आल्यानंतर मंगळवारी या विधेयकांवर लोकसभेत चर्चा सुरू असताना पाकिस्तानने भरवलेल्या विशेष अधिवेशनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हटले की, जर अशा महत्वाच्या प्रसंगी जगाने दखल घेतली नाही तर उशीर होईल. मी अणुयुद्धाची धमकी देत नाहीये, मी समंजसपणा दाखवण्याबद्दल बोलत आहे. अशा परिस्थितीमुळे अवघ्या मानवतेला धोका आहे. भाजपचे वागणे हिटलरच्या नाझी पक्षापेक्षा वेगळ नाही.