Home शहरे अहमदनगर अहमदनगर : ‘तो’ खून अनैतिक संबंधातून, 3 तासांत ‘गुढ’ उकललं

अहमदनगर : ‘तो’ खून अनैतिक संबंधातून, 3 तासांत ‘गुढ’ उकललं

0

अहमदनगर : शेवगाव शहरात रात्री झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कृष्णासिंग पुनमसिंग भोंड (वय २२), परमेश्वर पुनमसिंग भोंड (वय १९), लक्ष्मण किसन कांबळे (वय ३०, सर्व रा.रामनगर, शेवगाव) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, पाथर्डी रोडवरील आयटीआय समोरील मोकळ्या जागेतील गवतात आज सकाळी ७ वाजता सुमारास माहिती मिळाली होती. सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता बापूसाहेब एकनाथ घनवट (वय ३७, रा. म्हसोबानगर, शेवगाव) याचा कोणीतरी डोक्यावर व तोंडावर जबर दुखापत करून खून केला होता.

पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची तीन पथके तयार करून तपास सुरू केला घटनास्थळाच्या बाजूला राहत असलेल्या महिलेशी असणाऱ्या अनैतिक संबधातून सदर इसमाचा खून झाला असावा असा संशय आला. त्यामुळे महिलेस ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. रात्री साडेदहा वाजता तिघांनी घनवट यांना मारहाण केली अशी माहीती दिली. महिलने दिलेल्या माहितीवरून तीनही आरोपींचा शेवगाव परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी बापूसाहेब यास लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्याचे अंगावर गवत टाकून प्रेत लपविले असल्याची कबुली दिली.

पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे याचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक भरत काळे, सोपान गोरे, पोलीस कर्मचारी राजू चव्हाण, राजेंद्र केदार, प्रविण बागुल, वसुदेव डमाळे, राजेंद्र नागरगोजे, संदिप दरवडे, सोमनाथ सोनटक्के, किशोर शिरसाठ, अभय लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल ढाळे यांनी केले आहे.