परभणी : उशीराने आलेल्या मानव विकास बसेस रोखून धरल्या

- Advertisement -

परभणी : ग्रामीण भागामध्ये विद्यार्थीनी ने आण करणाऱ्या मानव विकास च्या (एसटी) बसेस ग्रामीण भागात उशीराने येत असल्याने, विद्यार्थीनी वेळीच शाळेत पोहचू शकत नसल्याने, यांचा विद्यार्थीनी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पाथरी आगारातील मानव विकास च्या (एसटी) बसेस उशीरा आल्याने गुरुवार, ०८ ऑगस्ट रोजी पाथरी गुंज क्रमांक (एमएच.०६.एस.५८३४) आणि पाथरी कानसुर (एमएच.२०.बीएल.३५०५) संतप्त झालेल्या विद्यार्थीनी व पालकांनी काही काळ रोखून धरल्या. होत असलेली गैरसोयी टाळावी यासाठी आगार प्रमुखांनी येथे येऊन लेखी द्यावे अशी मागणी विद्यार्थीनी व पालकांकडून करण्यात येत होती.

पाथरी आगाराच्या (एसटी) बसेस रोखून धरल्याचे कळताच पाथरी पोलीस बाभळगाव फाटा येथे लागलीच पोहचले. पाथरी आगारातील मानव विकास मिशनच्या ११ पैकी ४ (एसटी) बसेस कमी करण्यात आल्याने, याचा वेळीच शाळेत पोहचू शकत नसल्याने याचा फटका विद्यार्थीनीना बसत आहे. गाव तेथे शाळा, शाळा ते घर यांच अंतर जास्त असल्याने विद्यार्थींचे साक्षरतेचे प्रमाण कमी होते. साक्षरतेचे प्रमाण वाढावे यासाठी वाजत गाजत महाराष्ट्र भरात मानव विकास मिशनच्या माध्यमातून एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र मानव विकास योजना केवळ नावापुरती ठरते काय असा प्रश्न आता पडू लागला आहे.

पाथरी आगारातून पाथरी ते गुंज एसटी बस मध्ये गुंज, लोणी, बाभळगाव, येथील तर पाथरी कानसुर एसटी बसेसमध्ये कानसुर येथील विद्यार्थीनी जा ये करता माञ पाथरी आगारातील मानव विकास मिशनच्या ११ (एसटी) बसेस पैकी ४ कमी करण्यात आल्याने यांचा फटका विद्यार्थीनी बसत आहे यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थीनी व पालकांनी काही काळ पाथरी आगारातील मानव विकास मिशनच्या एसटी बसेस रोखून धरल्या. पाथरी आगार प्रमुखांनी घडल्या प्रकारची वरीष्ठांना माहिती दिली असल्याचे कळते. मानव विकास एसटी बसेस मध्ये प्रवाशांना घेतले जाते. त्यामुळे विद्यार्थीनीना उभे राहावे लागते तर कधी जागा न मिळाल्याने विद्यार्थीनीना आर्थिक भुर्दंड सहन करत जीव धोक्यात घालून खाजगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. होत असलेली गैरसोयी दुर करावी अशी मागणी विद्यार्थीनी व पालकांमधुन होत आहे.

- Advertisement -