पुणे : जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरपरिस्थितीत नागरीकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यालये पूर परिस्थितीच्या निवारणासाठी दि. 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
- Advertisement -