Home बातम्या ऐतिहासिक अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत ०९ ऑगस्ट रोजी माणगांव तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचे शानदार आयोजन

अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत ०९ ऑगस्ट रोजी माणगांव तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचे शानदार आयोजन

0

बोरघर / माणगांव ( प्रतिनिधी ) माणगांव तालुक्यात ०९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जागतिक आदिवासी दिन व आदिवासी समाज सुधारक जानू गणपत कोळी यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन वनवासी कल्याण आश्रम शाळा उतेखोल माणगांव या ठिकाणी दु. १२ वाजता करण्यात आले आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासात आदिवासी महापुरुषांची आणि महानायिकांची फक्त नावेच आढळतात. काही वेळेला नावेसुद्धा आढळत नाहीत, ही भारतातील आदिवासी समाजाची शोकांतिका आहे.
आदिवासी समाजातील महानायिका व महापुरुषांच्या तेजस्वी कार्याची आणि तेजस्वी विचारांची ओळख आजच्या आदिवासींना झालेली नसल्याने आदिवासी समाजाची प्रेरणा नष्ट झालेली आहे. यामुळे आदिवासी समाज एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा दोरा तुटलेल्या पतंगासारखा भटकत आहे. दारिद्र्य, निरक्षरता, व्यसनाधितेच्या विळख्यात अडकत चालला आहे.


यामुळे आदिवासिंचे भविष्य उज्वलमय प्रेरणादायी निर्माण होण्याचा उद्देशाने तसेच आदिवासींच्या अस्तित्वाचा व स्वाभिमानाचा दिवस म्हणून ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी तसेच मागील वर्षी ९ ऑगस्टच्या दिवशी देवअज्ञा झालेले थोर आदिवासी समाजसुधारक कै. जानू गणपत कोळी या महान कार्यकर्त्यांचा स्मृतिदिन आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते ऐनघर पंचक्रोशी अठरा गाव बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश देवराम कातकरी, आदिवासी संघटना सरचिटणीस व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. पी. पवार, माणगांव आदिवासी संघटना महिला अध्यक्षा इंदिरा मारुती पवार, महिला उपाध्यक्षा ताराबाई जाधव, शंकर जानू कोळी हे उपस्थित असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती माणगांवचे जेष्ठ पत्रकार अरुणजी पवार, मजीत हाजिते, संतोष सुतार, विश्वास गायकवाड, महेश शेलार, श्याम लोखंडे या पत्रकारांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी आदिवासी बांधव व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष एकलव्य आदिवासी संघटना व माणगांव आदिवासी समाज अध्यक्ष पत्रकार भिवा पवार यांनी केले आहे.