Home ताज्या बातम्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 22 ऑगस्टला ग्रामसेवक संघटनेचे राज्यभर तीव्र आंदोलन

मागण्या मान्य न झाल्यास येत्या 22 ऑगस्टला ग्रामसेवक संघटनेचे राज्यभर तीव्र आंदोलन

0

माण खटाव : डॉ विनोद खाडे

संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी वाढीव वेतनश्रेणी व इतर विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलनाचे अस्त्र उगारले असून सध्याची अतिवृष्टी व पूरस्थिती पहाता तात्पुरते एक दिवसाचे आंदोलन करत असून,शासनाने दखल न घेतल्यास येत्या 22 ऑगस्ट ला संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कार्यालयाना टाळे लावून काम बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन डी ई ई 136 या संघटनेने हे आंदोलन पुकारले असून सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका शाखेच्या वतीनं वडुज येथे एकदिवसीय असहकार आंदोलन करण्यात आले.यावेळी संघटनेचे राज्य मानद सचिव उद्धव फडतरे, तालुका अध्यक्ष बबनराव ढेम्बरे, मानद अध्यक्ष सुनील राजगुरू, कार्याध्यक्ष संदीप जगदाळे, सचिव चांदशा काझी यांचेसह सर्व ग्रामसेवकांची उपस्थिती होती. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावं,प्रवास भत्ता व वेतनवाढ करावी, लोकसंख्येवर आधारीत रिक्त पदासाठी पदवीधराना संधी द्यावी.सन2005 नंतर नियुक्ती धारकांना जुनी पेन्शन श्रेणी मिळावी या प्रमुख प्रलंबित मागण्या आहेत.पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सदाशिव खाडे यांनी आंदोलनास पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले.तर संगणक कक्ष,कंत्राटी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यावतीने ही पाठिंबा जाहीर करण्यात आला. चाँदशा काझी,डी ए भोसले,राजगुरू यांनीही आपली मते व्यक्त केली. यावेळी प्रमुख प्रलंबित मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी रमेश काळे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.”आंदोलन असले तरी गावातील विकास कामे व जन जीवनावर कोणताही अनुचित परिणाम होणार नसल्याचे उद्धव फडतरे यांनी सांगितले.एकंदरीत शासनाच्या कमी काम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त वेतन, तर जास्त काम,अतिरिक्त काम असणाऱ्या ग्रामसेवकांना मात्र कमी वेतन,याकडे ही शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे