पूर पिडीत गोरेगांव विभागातील सोन्याच्या वाडीचे होणार पुनर्वसन पालकमंत्री : रविंद्र चव्हाण

- Advertisement -

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) मागील आठवड्यात संपूर्ण राज्यासह रायगड जिल्हा आणि विशेष करून माणगांव तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काळ आणि गोद नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले होते. माणगांव तालुक्यामध्ये झालेल्या या प्रचंड अतिवृष्टीमुळे गोरेगाव विभागातील सोन्याच्या वाडीमध्ये मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या जल प्रलया मुळे संपूर्ण सोन्याच्या वाडीला पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला होता. या पूरपरिस्थितीतून जीवाची पर्वा न करता जिगरबाज माणगांव पोलीस आणि एनडीआरएफ च्या बचाव पथकाने सोन्याच्या वाडीतील भयभीत झालेल्या साठ लहान थोर ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले होते. माणगांव तालुक्यातील गोरेगांव नजदीक असलेल्या या पूरग्रस्त सोन्याच्या वाडीची पाहणी करण्यासाठी आज शनिवार दिनांक दिनांक १० ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्त्यां समवेत या गावाची पाहणी केली. आणि ग्रामस्थांन सोबत संवाद साधला. सोन्याच्या वाडीवर दरवर्षी पावसाळ्यात ओढावणार्या या जीवघेण्या पूरपरिस्थितीमुळे या गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे गावाच्या पुनर्वसनाची मागणी केली. सदर मागणीचे आणि तिथल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी सदर गावाच्या पुनर्वसनाची मागणी त्वरित मंजूर करण्याचे आदेश शासकीय अधिकारी व माणगांव तहसीलदार प्रियंका अहिरे, तलाठी, ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनसाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर उपलब्ध करून त्याच ग्रामपंचतीच्या आवारात पर्यायी जागा उपलब्ध करून पुनर्वसनाचे आदेश दिले. यावेळी माणगांव तालुका भाजप अध्यक्ष संजय(अप्पा) ढवळे, तालुका सरचिटणीस योगेश सुळे, अशोक यादव, अश्विनी यादव, किशोर पवार, नाना महाले, जयेंद्र मुंढे, युवराज मुंढे, शहानाज खाचे, अस्लम भौर, मिलिंद जोशी, राजू परांजपे, सारिका काळेकर, बाबुराव चव्हाण, संजय जाधव, राजू मुंढे, यशोधरा गोडबोले, मेघा धुमाळ इत्यादी कार्यकर्ते आणि सोन्याच्या वाडीतील सर्व पुरपिडीत ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुरपिडीत सोन्याच्या वाडीतील ग्रामस्थांशी गावाच्या पुनर्वसना संदर्भात संवाद साधता ना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या समवेत माणगांव तहसीलदार प्रियंका आयरे मॅडम, भाजप चे माणगांव तालुका अध्यक्ष श्री. संजय ( अप्पा ) ढवले आणि प्रशासकीय अधिकारी दिसत आहेत. ( छाया : विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव )

- Advertisement -