Home ताज्या बातम्या छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतराबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आभार व्यक्त

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतराबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आभार व्यक्त

0
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतराबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आभार व्यक्त

चंद्रपूर, दि. २५: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या नामांतरास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने आपल्याला अत्यंत आनंद झाला असून या बहुप्रतिक्षीत नामांतरासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित  शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मंत्री श्री. मुनगंटीवार आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की, मी विधानसभेत अनेकदा हा विषय उपस्थित केला होता. उस्मानाबादचे मूळ प्राचीन नाव धाराशिव आहे. परकीय आक्रमकाने दिलेले नाव बदलून मूळ धाराशिव हे नाव द्यावे ही स्थानिक जनतेची मागणी होती. औरंगाबाद शहराचे नाव मुघल आक्रमक औरंगजेबाच्या नावावरून पडले होते. त्यामुळे हे नाव बदलणे अत्यावश्यक होते, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

000

वर्षा आंधळे/विसंअ