Home ताज्या बातम्या सुमंगलम पंचमहाभूत लोकत्सवातून पर्यावरण जागृती – केंद्रीय मंत्री नारायण राणे

सुमंगलम पंचमहाभूत लोकत्सवातून पर्यावरण जागृती – केंद्रीय मंत्री नारायण राणे

0
सुमंगलम पंचमहाभूत लोकत्सवातून पर्यावरण जागृती – केंद्रीय मंत्री नारायण राणे

कोल्हापूर, दि २६ (जिमाका) : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ द्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याचा हा मठाचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे . असे प्रतिवादन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले . अध्यक्षस्थानी दत्तात्रेय होसबाळे होते.

यावेळी व्यासपीठावर खा.आण्णासाहेब जोल्ले ,आ. महेश शिंदे ,काड सिद्धेश्वर स्वामी , कर्नाटक विधान परिषद सभापती बसवराज होराठी , शशिकला जोल्ले , जिल्हाधिकारी राहूल रेखावार , जि .प मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण आदी उपस्थित होते .
श्री राणे म्हणाले , या मठाद्वारे निरपेक्ष वृत्तीने अनेक देश विधायक कामे झाली आहेत . या महोत्सवाद्वारे प्रदुषण जागृती बाबत उल्लेखनीय कार्य झाले असून या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी झोकून देवून काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तसेच या मठातील गोपालन आदर्शवत असून या मठाच्या धरतीवर आपण कोकणात गोशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेणार असल्याचेही राणे यांनी सांगितले .

दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, पृथ्वीसोबत आपला व्यवहार कसा आहे ? याचे सर्वांनी अतःर्मुख होवून अवलोकन करावे .प्रत्येकाने निसर्गानुरूप जीवन शैलीचा अंगीकार करावा . सुखी जीवनासाठी पंचमहाभूत तत्वाला अनुसरून आचरण करावे . भविष्यातील धोका ओळखून पर्यावरण जागृतीचा संदेश या महोत्सवाद्वारे देशात किंबहुना जगात जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . याप्रसंगी काड सिद्धेश्वर स्वामी , बसवराज होराठी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . या समारोप कार्यक्रम प्रसंगी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक उपस्थित होते .

000